Rabbi pick Bima Bhara from the mobile phone is also sitting at home!

रब्बी पिक विमा मोबाईल वरून कसा भरावा

 

 शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत रब्बी पिक विमा हा मोबाईल वरून घरबसल्या कशाप्रकारे आपल्याला भरता येईल, पिक विमा भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना PMFBY (प्रधानमंत्री फसल बीमा योजना) या सरकारच्या अधिकृत माध्यमांद्वारे अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. त्याचबरोबर मोबाईल वरून देखील पिक विमा कसा भरता येईल ,तर चला पाहूया !

हे देखील वाचा :-

1)बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपये

2)Rahul Gandhi Mahalaxmi Yojana provide 3000 rupees per month

पिक विमा मोबाईल वरून कसा भरावा ?

1‌) मित्रांनो सर्वप्रथम आपणास मोबाईल वरती PMFBY CROP INSURANCE ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.

2) ॲप डाऊनलोड केल्यानंतर, तुमचा मोबाईल नंबर टाका व आलेला OTP द्वारे तुम्ही लॉगिन करू शकता.

3) लॉगिन केल्यानंतर, PMFBY INSURANCE या पर्यायावर क्लिक करा. नंतर राज्य ,हंगाम, योजनेचे नाव आणि योजनेचे वर्ष निवड

4)वरील सर्व पर्याय भरल्यानंतर, सेवा आणि सबमिट या बटनावर क्लिक करावे.

5) यानंतर बँक इन्फॉर्मेशन ( बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFC NO) अचूक प्रमाणे भरावे.

6) शेतकऱ्यांची माहिती या आधार कार्ड प्रमाणे भरण्याची यावी, त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव ,पत्ता आणि आधार नंबर दिलेला पाहिजे व पिन कोड देखील असणे आवश्यक आहे.

7) पुढील पायरी म्हणजे जिल्हा तालुका तहसील आणि गाव हे अचूक निवडावे.

8) पिकाची माहिती त्यामध्ये पिकाचे नाव, लागवड तारीख ,सर्वे नंबर, खाते नंबर आणि मालकी हक्क भरावे लागेल.

9) जर या अगोदर आपण पिक विमा भरला असेल ,तर त्या आधीची माहिती दिसेल तुम्ही ती माहिती तपासून पाहू शकता .त्यानंतर आधार कार्ड ,सातबारा ,बँक पासबुक आणि पीक फेरा प्रमाणपत्र ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

10) सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल जी तुम्ही डाऊनलोड करू शकता व नंतर त्याची प्रिंटर देखील काढू शकता.

रब्बी पिक विमा मोबाईल वरून घर बसल्या भरण्याची प्रक्रिया खूप झोपली आहे आणि सोयीस्कर आहे. शेतकऱ्यांना कागदपत्रे आणि  इतर प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात त्यामुळे मोठा फायदा होतो .

रब्बी पिक विमा मोबाईल वरून कसा भरावा पुढील video पहा :-👇👇

 

https://youtu.be/1TeKI1I7aaY?si=fNvSNrW6ru_WM8I8

 

शेतकरी विमा कधी दिला जातो. :-

1) पिक पेरणी पासून ते काढणीपर्यंत या कालावधीत जर नैसर्गिक आग वीज कोसळली किंवा गारपीट वादळ ,चक्रीवादळ ,पूर पीक क्षेत्र जन्म गळणे ,भूस्खलन , पावसातील खंड निर्माण होणे पिकाला कीड रोग येणे इत्यादी बाबी हंगामाचे शेवटी उत्पन्न येणारी घट या योजनेअंतर्गत भरून काढली जाते.

2) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जर पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान या योजनेअंतर्गत दिले जाते.

3) स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामध्ये समावेश होते, नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे कारणे पश्चात नुकसान देखील या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते.

रबी पीक विम्याचे प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-

★रब्बी हंगामातील पिकांसाठी हा विमा लागू असेल .

★नैसर्गिक आपत्ती कीड व रोग यांपासून पिकांचे संरक्षण करणे.

★शेतकऱ्यांना खूप कमी दरांमध्ये प्रीमियम.

★शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा यात दिली  जाते.

प्रश्न आणि उत्तर :-

1 )प्रश्न:- रब्बी पिक चा फॉर्म भरण्यासाठी कित पैसे लागतात?   

    उत्तर :- फक्त 1 रुपया मध्ये तुमचा फॉर्म भरला जातो. 

2) प्रश्न :- रब्बी पिकाची तारीख फॉर्म भरण्याची कधीपर्यंत आहे ?शे

उत्तर:-  1जानेवारी पर्यंत आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top