Site icon techbuddy360

Low CIBIL Education Loan

Low CIBIL Education Loan:कमी सिबिल स्कोर मध्ये मिळवा शैक्षणिक कर्ज..

    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , सदर लेखामध्ये आपण शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कमीत कमी किती सिबिल स्कोर असणे आवश्यक असणे गरजेचे आहे, तरच शैक्षणिक कर्ज मिळते याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पुढील प्रमाणे. बँकांकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. पण हे कर्ज देताना सिबिल स्कोरच्या च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन हे बँकांकडून शैक्षणिक कर्ज अर्जाचे केले जाते. त्यामुळे शैक्षणिक कर्ज बँकांकडून घेण्यापूर्वी सिबिल स्कोर चे महत्व समजून घेणे विद्यार्थ्यांसाठी खूपच आवश्यक आहे.

     सदर लेखांमध्ये आपण कमी सिबिल स्कोर असेल तर शैक्षणिक कर्ज मिळू शकते काय? ते आपण पाहणार आहोत , त्याचबरोबर याचा वित्त पुरवठ्यावर काय परिणाम होतो त्याचबरोबर कमी सिबिल स्कोर असेल तर या सिबिल स्कोर वर शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या आहेत? याविषयीची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

 

 CIBIL for Education Loan :-

शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी जो अर्जदार आहे .त्या अर्जदाराची क्रेडिट पात्रता तपासण्यासाठी सिबिल स्कोर हा प्राथमिक घटक समजला जातो. तसे पाहायला गेले तर शैक्षणिक कर्ज हे असुरक्षित कर्जाच्या यादीमध्ये या खर्चाचा समावेश केला जात असल्यामुळे कर्ज देताना सिबिल स्कोर चे महत्व जास्त असते.

उच्च सिबिल स्कोर असलेल्या कर्जदाराला किंवा विद्यार्थ्याला खालील वैशिष्ट्यसह कर्ज मिळवण्यासाठी सहाय्य होते .

जर तुम्हाला तुमचा cibil score जर check करायचा असेल तर येथे click करा.

शैक्षणिक कर्जामधील CIBIL स्कोरचे महत्व पुढील प्रमाणे :-

शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर श्रेणी पुढील प्रमाणे :-

शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी 750 आणि त्यावरील सिबिल स्कोर उत्कृष्ट मानला जातो. उच्च सिबिल स्कोर अर्जदारांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लवकर त्रास मुक्त शैक्षणिक कर्जाची हमी देते. शैक्षणिक कर्जाचा एखाद्या विद्यार्थ्याच्या सिबिल स्कोरवर परिणाम होतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड योग्य त्या हप्त्यामध्ये केली जाते जेणेकरून सिबिल स्कोर चांगला होण्यास मदत होते.

 

कमी सिबिल स्कोर असेल तर शैक्षणिक कर्ज मिळू शकते का? | Low CIBIL Education Loan

जर कोणी शैक्षणिक कर्ज घेत असेल आणि त्याचा सिबिल स्कोर हा कमी असेल तर त्याला शैक्षणिक कर्ज मिळू शकते, पण शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी काही पुढील गोष्टी आवश्यक आहे.व्ज

 1 )व्याजदर  :-वित्तीय संस्था या अनेकदा जास्त व्याजदर आकारून            कमी सिबिल स्कोर च्या जोखमीची भरपाई करत असतात. 

2) तारण  :- काही बँका तुम्हाला कर्ज सुरक्षित करण्यासाठी  मालमत्ता किंवा मुदत ठेव यासारखे तारण ठेवण्यास सांगू शकतात.

3 )सह अर्जदार/पालकांचा सिबिल स्कोर: शैक्षणिक कर्ज घेणाऱ्याचा सिबिल स्कोर कमी असल्यास बँका निर्णय घेण्यासाठी सह अर्जदाराच्या आर्थिक इतिहासावर अवलंबून असतात कारण चांगला स्कोर असलेला सह अर्जदार तुमच्या शैक्षणिक कर्जाच्या मंजुरीची शक्यता वाढवू शकतो व ते विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरते.

4)नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या: एचडीएफसी क्रेडीला, अव्हान्से फायनान्शियल सर्विसेस, इनक्रेड यासारख्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या अनेकदा सिबिल स्कोर न तपासता ही शैक्षणिक कर्ज देऊ शकतात अशी गोष्ट विद्यार्थ्यांसठी आनंदाची गोष्ट असते.

शैक्षणिक कर्जासाठी CIBIL स्कोरची अट कमी करण्याचा निर्णय…

 

  जर एखाद्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणाची शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल पण जर तुमचा सिबिल स्कोर कमी असेल ,तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण आता सिबिल स्कोर हा शैक्षणिक कर्जाच्या गरजेचा लागू शकत नाही . असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला गेला आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्याला खराब सिबिल किंवा कमी सिबिल स्कोर मुळे शैक्षणिक कर्ज नाकारण्यात आले होते त्याचा परिणाम असा झाला की. त्यामुळे शैक्षणिक कर्जाबाबत थोडा मानवतावादी आधारावर निर्णय घ्या असे न्यायालयाने बँकांना खडसावले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचा सिबिल स्कोर कमी किंवा खराब असल्याने त्यांचे अर्ज फेटाळणे हे योग्य नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला असून आता सुलभ प्रमाणे त्यांना शैक्षणिक कर्ज काढता येईल .

 

अजून माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा 👇👇

हे देखील वाचा :-

बांधकाम कामगारांना मिळणार आता दहा हजार रुपयेलाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनसलाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस

 

Exit mobile version